एस.एस.सी जीडी फुल फॉर्म SSC GD Full Form In Marathi

SSC GD Full Form In Marathi दरवर्षी स्टाफ सिलेक्शन कमीशन म्हणजे एस.एस.एस द्वारे विविध परीक्षांचे आयोजन केले जाते. एस.एस.सी हे एक सरकारी संघटन आहे. मराठी भाषेमध्ये स्टाफ सिलेक्शन कमीशन ला “कर्मचारी निवड आयोग” असे म्हणले जाते. आजच्या लेखामध्ये आपण एस.एस.सी द्वारे घेण्यात येणाऱ्या एका परीक्षेविषयी म्हणजे एस.एस.सी जी.डी परीक्षेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. याचसोबत आजच्या लेखामधून आपण जी.डी चा फुल्ल फॉर्म देखील पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे एस.एस.सी जी.डी विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

SSC GD Full Form In Marathi

एस.एस.सी जीडी फुल फॉर्म SSC GD Full Form In Marathi

एस.एस.सी जी.डी फुल्ल फॉर्म (SSC GD full form)

एस एस.सी द्वारे घेण्यात येणाऱ्या जी.डी परीक्षेचा फुल्ल फॉर्म हा “जनरल ड्युटी कॉन्स्टेबल” असा होतो. स्टाफ सिलेक्शन कमीशन द्वारे घेण्यात येणारी जी.डी कॉन्स्टेबल परीक्षा ही दरवर्षी आयोजित केली जाते आणि या एस.एस.सी जी.डी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड स्टाफ सिलेक्शन कमीशन द्वारे विविध पदांसाठी केली जाते.

या पदांमध्ये सीआईएसएफ, सीआरपीएफ, एसएसबी, बीएसएफ,आईटीबीपी ,इत्यादी पदांचा समावेश असतो. एस.एस.सी जी.डी ची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांना भारतीय सेनेत जाऊन देशाची सेवा करण्याची संधी मिळते.

एस.एस.सी द्वारे घेण्यात येणारी जी.डी ची परीक्षा ही १० वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी असते. एस.एस.सी जी.डी ची परीक्षा तीन चरणांमध्ये आयोजित केली जाते. या तीन चरणांमधील पाहिले चरण म्हणजे ऑनलाईन चाचणी ,त्यानंतरचे दुसरे चरण म्हणजे शारीरिक चाचणी आणि तिसरे आणि शेवटचे चरण म्हणजे चिकित्सा चाचणी. या तीनही चरणांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड एस.एस.सी द्वारे विविध पदांसाठी केली जाते.

एस.एस.सी जी.डी परीक्षेसाठी असणारी पात्रता निकष (Eligibility criteria for SSC GD exam in Marathi)

१) एस.एस.सी च्या जी.डी परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवार हा १० वी उत्तीर्ण असला पाहिजे. ज्या उमेदवाराचे १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले नाही ,तो उमेदवार एस.एस.सी च्या जी.डी परीक्षेसाठी अपात्र ठरतो.

२) एस.एस.सी च्या जी.डी परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराची आयुसीमा ही १८ वर्ष ते २३ वर्ष इतकी असते; परंतु जातींच्या आधारावर त्या जातीतील उमेदवारांना आयुसीमेमध्ये सूट दिली जाते.

३) एस.एस.सी च्या जी.डी परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी पुरुष उमेदवाराची उंची ही १७० सेंटी मीटर पेक्षा जास्त असली पाहिजे ,तसेच पुरुष उमेदवाराची छाती ही ८० सेंटी मीटर पेक्षा जास्त असली पाहिजे.

४) एस.एस.सी च्या जी.डी परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी महिला उमेदवारांची उंची ही १५७ सेंटी मीटर पेक्षा जास्त असली पाहिजे.

एस.एस.सी ची जी.डी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांचा मासिक पगार (Monthly Salary of SSC GD exam passed candidate in Marathi)

एस.एस.सी जी.डी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांना सरकारद्वारे विविध सुविधा मिळतात ,तसेच त्यांचे भविष्य देखील सुरक्षित होते. एस एस.सी ची जी.डी परीक्षा उत्तीर्ण करून पदावर कार्यरत झालेल्यांचा मासिक पगार हा साधारण २१,६०० रुपये ते ६९,१०० रुपये इतका असतो.

FAQ

एस.एस.सी द्वारे घेण्यात येणाऱ्या जी.डी परीक्षेचा फुल्ल फॉर्म काय आहे ?

एस.एस.सी द्वारे घेण्यात येणाऱ्या जी.डी परीक्षेचा फुल्ल फॉर्म हा “जनरल ड्युटी कॉन्स्टेबल” असा आहे.

एस.एस.सी ला मराठीमध्ये काय म्हणतात ?

एस.एस.सी ला इंग्रजी भाषेमध्ये “स्टाफ सिलेक्शन कमीशन” असे म्हणतात तर ,मराठी भाषेमध्ये एस.एस.सी ला “कर्मचारी निवड आयोग” असे म्हणतात.

एस.एस.सी ची जी.डी परीक्षा किती चरणांमध्ये आयोजित केली जाते ?

एस.एस.सी ची जी.डी ही परीक्षा तीन चरणांमध्ये आयोजित केली जाते. या तीन  चरणांमध्ये कॉम्प्युटर चाचणी ,शारीरिक चाचणी आणि चिकित्सा चाचणी या चरणांचा समावेश असतो.

एस.एस.सी च्या जी.डी परीक्षेसाठी पात्रता निकष काय असतो ?

एस.एस.सी ची जी.डी परीक्षा देण्यासाठी उमेदवाराची आयुसीमा ही १८ वर्ष ते २३ वर्ष इतकी असली पाहिजे. तसेच एस.एस.सी च्या जी.डी परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे. याचसोबत एस.एस.सी च्या जी.डी परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी पुरुष उमेदवाराची उंची ही १७० सेंटी मीटर पेक्षा जास्त आणि छाती ही ८० सेंटी मीटर पेक्षा जास्त असली पाहिजे. तसेच एस.एस.सी च्या जी.डी परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी महिला उमेदवारांची उंची ही १५७ सेंटी मीटर पेक्षा जास्त असली पाहिजे.

एस.एस.सी द्वारे घेण्यात येणाऱ्या जी.डी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्यांची निवड कोणकोणत्या पदांसाठी केली जाते ? 

एस.एस.सी द्वारे घेण्यात येणाऱ्या जी.डी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड ही सीआईएसएफ, सीआरपीएफ, एसएसबी, बीएसएफ,आईटीबीपी ,इत्यादी पदांसाठी केली जाते.

एस.एस.सी ची जी.डी परीक्षा उत्तीर्ण करून पदावर कार्यरत असणाऱ्यांचा मासिक पगार हा साधारण किती असतो ?

एस.एस.सी ची जी.डी परीक्षा उत्तीर्ण करून पदावर कार्यरत असणाऱ्यांचा मासिक पगार हा साधारण २१,६०० रुपये ते ६९,१०० रुपये इतका असतो.

एस.एस.सी द्वारे दरवर्षी किती वेळी जी.डी परीक्षेचे आयोजन केले जाते ?

एस.एस.सी द्वारे दरवर्षी एकाच वेळा जी.डी परीक्षेचे आयोजन केले जाते.

एस.एस.सी ची जी.डी परीक्षा उत्तीर्ण करणे सोपे आहे की अवघड ?

एस.एस.सी ची जी.डी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी आपण शारीरिक रित्या फीट असलो पाहिजे. तसेच आपण मनलावून अभ्यास केला आणि दररोज धावण्याचा सराव केला तर ,आपण एस.एस.सी ची जी.डी परीक्षा नक्की उत्तीर्ण करू शकतो.

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या लेखामध्ये आपण एस.एस.सी द्वारे घेण्यात येणाऱ्या जी.डी परीक्षेविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण एस.एस.सी जी.डी चा फुल्ल फॉर्म ,एस.एस.सी जी.डी परीक्षेसाठी असणारी पात्रता निकष, एस.एस.सी ची जी.डी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांचा मासिक पगार, एस.एस.सी जी.डी परीक्षे विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे, इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (References)

१)https://testbook.com/blog/hi/ssc-gd-kya-hai/amp/#–SSC-GD-kya-hai-hindi-me

२)https://leverageedu.com/blog/hi/ssc-gd-full-form-in-hindi/

३)https://en.m.wikipedia.org/wiki/Staff_Selection_Commission

४)https://byjusexamprep.com/ssc-exam/ssc-gd-constable-full-form-in-hindi

५)https://guidely.in/learn/exams-how-many-times-ssc-gd-held-in-a-year

Leave a Comment